पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

22-Year-Old Woman Assault Case कल्याण शहरात भाजपच्या माजी आमदारासह एका पोलीसाने २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Kalyan Crime: Former BJP MLA and Cop Face Gang Rape Allegations

Kalyan Crime: Former BJP MLA and Cop Face Gang Rape Allegations

Esakal

Updated on

भाजपच्या माजी आमदारासह बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यावर सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण शहरात मदतीच्या बहाण्याने पीडितेला कार्यालयात बोलावून तिच्यावर बापगाव इथं नेत अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवत आणि दारू पाजत सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com