esakal | पूजा करताना लुंगीने पेट घेतला, BMC चे माजी आयुक्त नलिनाक्षन यांचा भाजून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

K Nalinakshan

पूजा करताना लुंगीने पेट घेतला, BMC चे माजी आयुक्त नलिनाक्षन यांचा भाजून मृत्यू

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त (Former Commissioner) के. नलिनाक्षन (K Nalinakshan) यांचे शुक्रवारी पहाटे भायखळा येथील मसीना रुग्णालयात ( Masina Hospital) उपचार सुरू असताना निधन (Death) झाले. ते 79 वर्षाचे होते. बुधवारी सकाळी (Wednesday Morning) राहत्या घरी पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतला आणि त्यात ते ८० ते ९० टक्के भाजले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. (Former Commissioner Of BMC K Nalinakshan Died)

हेही वाचा: हॉस्पिटलमध्येच डॉक्टरचा नर्सवर जबरदस्तीचा प्रयत्न, नालासोपाऱ्यातील घटना

भारतीय सनदी सेवेतील (आयएएस) १९६७ च्या तुकडीचे अधिकारी असलेले नलिनक्षान यांनी १९९९-२००१ कालावधीत मुंबई पालिकेत आयुक्तपद भूषविले होते. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पदासह अन्य विभागांचा कार्यभार सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील आझाद मैदान पर्यंत येणारा भुयारी मार्ग त्यांंच्या कार्यकाळात बांधण्यात आला होता. चर्चगेट येथील ‘ए’ मार्गावरील शर्विले इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. नलिनाक्षन हे नेहमीप्रमाणे घरातील देवघरात पूजा करत असताना त्यांच्या लुंगीने पेट घेतल्याने ते भाजले. त्यांंच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

loading image