esakal | दिल्लीच्या आदेशामुळे कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश ?
sakal

बोलून बातमी शोधा

Krupashankar-Singh

दिल्लीच्या आदेशामुळे कृपाशंकर सिंह यांचा भाजपा प्रवेश ?

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह (krupashankar singh) यांना भाजप (bjp) मध्ये प्रवेश देण्यासाठी थेट दिल्लीतून (delhi) आदेश आल्याची चर्चा आहे. मात्र, कृपाशंकर सिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेस (congress) मधून भाजपत येऊन स्थिरस्थावर झालेल्या उत्तर भारतीय नेत्यांमध्ये (north india leaders) धाकधुक वाढली आहे. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कृपाशंकर सिंह यांना भाजप मध्ये प्रवेश दिल्याची चर्चा आहे. मात्र, राज्यातील नेते त्यांना भाजप मध्ये घेण्यास फारसे इच्छूक नव्हते, असे संकेत मिळत आहेत. (Former congress leader krupashankar singh join bjp delhi top leadership instruction to state leadership)

मुंबईत 25 ते 26 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. पूर्वी ब्राम्हण, ठाकूर आणि बनिया हे भाजपचे मतदार होते. तर, ओबीसी, दलित उत्तर भारतीय हे काँग्रेसचे मतदार होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून एकगठ्ठा उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळला आहे. त्याचाच फायदा भाजपला 2017 च्या पालिका निवडणुकीतही झाला. त्याच बरोबर आताही उत्तर भारतीय मतदारांचा कल फारसा बदललेला नसल्याने तसेच उत्तर भारतातील तिन्ही प्रमुख राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांचाही फायदा मुंबईत होणार हे निश्‍चित आहे.

हेही वाचा: होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

त्यामुळे मुंबईत नव्या उत्तर भारतीय चेहऱ्याची गरज नसल्याचे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे होते. मात्र कृपाशंकर सिंह यांनी थेट दिल्लीतून हा प्रवेश करुन घेतला असल्याचे समजते. महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते माजी आमदार राजहंस सिंह, माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांनी यापूर्वीच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते नव्या पक्षात स्थिरावलेही आहेत. मात्र, आता कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशाने त्यांची धाकधुकही वाढली असणारच. कृपाशंकर सिंह हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच फेरीवाले आणि उत्तर भारतीय कष्टकऱ्यांची मोट त्यांनी चांगली बांधलेली आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह भाजप मध्ये आव्हान निर्माण करु शकतील अशी भिती या स्थिरावलेल्या माजी आमदारांना वाटत आहे.

हेही वाचा: 'छोट्या खात्याचा मंत्री' म्हणणाऱ्या राऊतांना राणेंचं उत्तर

म्हणून नको होते

कृपाशंकर सिंह यांच्यावर उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्तीचे तसेच विविध आर्थिक प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्यामुळे राज्यातील नेतृत्व कृपाशंकर सिंह यांना पक्षात घेण्यासाठी फारसे इच्छूक नव्हते. कृपाशंकर सिंह यांना पक्षात घेतल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या प्रचारात मुद्दा मिळू शकतो अशी भीती आहे.

दोन वर्ष प्रतिक्षेत

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी वरळीत सुरवातीला काही बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमध्ये कृपाशंकर सिंह सहभागी झाले होते. त्यामुळे ते शिवसेनेत जाण्याची शक्‍यता वर्तवली होती. मात्र,शिवसेनेकडून फारसा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर गेल्या काही महिन्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गेले नाहीत.

loading image