esakal | होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: लग्न जुळल्यानंतर होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay HC) अटकपूर्व जामीन (anticipatory bail) मंजूर केला आहे. दोन्ही कुटुंबांनी सुरुवातीला लग्नाला संमती दिली होती. लग्नाआधीचे काही विधी (pre-wedding ceremonies) सुद्धा झाले होते. पण काही महिन्यानंतर काही कारणांमुळे लग्न रद्द झालं. लग्न रद्द झाल्यानंतरही (wedding was called off) मुलगा आणि मुलगी परस्परांना भेटत राहिले. त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या दरम्यान मुलाने लग्न करायला नकार दिला. त्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार नोंदवून बलात्काराचा आरोप केला. (Bombay HC grants bail to man accused of raping fiancé rules she had given consent)

कस जुळलं लग्न?

दोन्ही कुटुंबांना ओळखणाऱ्या एका मध्यस्थामार्फत जानेवारी २०२० मध्ये माझ्या कुटुंबाला मुलाच्या बाजूने लग्नाला प्रस्ताव आला. आम्ही प्रस्ताव स्वीकारला व दोन्ही कुटुंबांमध्ये काही लग्नाआधीचे विधी सुद्धा झाले, असे मुलीने सांगितले.

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळातील मूळ चेहरा शिवसेना, राष्ट्रवादीचाच!

दोन्ही कुटुंबांनी मिळून नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न करायचं ठरवलं. मार्च महिन्यात २०२० मध्ये संपूर्ण देशभरात लॉकडाउन लावण्यात आला. दोन्ही कुटुंबांनी २०२१ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान तरुणी मुलाच्या कुटुंबाच्या संपर्कात होती.

२ मार्च २०२१ रोजी मुलाने मुलीला बोरिवलीतील त्याच्या घरी बोलावले. त्यावेळी मुलाच्या घरी कोणी नव्हते. दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. मी या अशा प्रकारच्या संबंधांसाठी तयार नव्हते, असे मुलीने म्हटले आहे. त्या प्रसंगानंतर मुलगी त्या मुलासोबत गोराई बीचजवळ असलेल्या काही हॉटेल्समध्ये गेली. दोघांनी एकत्र वेळ घालवला. हे सर्व सुरु असतानाच मुलाने लग्न करण्यास नकार दिला. मुलीने त्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवली. FIR दाखल झाला.

हेही वाचा: गाडीत बसलेल्या तरुणीला चाकूच्या धाकावर लुटलं, मुलुंडमधील धक्कादायक घटना

मुलाच्यावतीने कोर्टात युक्तीवाद करणाऱ्या वकिलाने लग्न डिसेंबर २०२० मध्ये रद्द झाल्याचे कोर्टाला सांगितले. त्यामागे कौटुंबिक कारणे होती. त्यामुळे मुलीला आपलं लग्न होणार नाही, याची कल्पना होती. तरीही दोघांमध्ये मार्च महिन्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, असा युक्तीवाद त्याने कोर्टात केला. महिलेची या संबंधांना मान्यता होती. त्यामुळे बलात्काराची कलमे लागू होत नाहीत, असा युक्तीवाद वकिलाने मुलाच्यावतीने कोर्टात केला. सरकारी वकिलाने महिलेच्या नातेवाईकांची जबानी असलेल्या कागदपत्रांच्या आधारावर अटकपूर्व जामिनाला विरोध केला. न्यायाधीशांनी कागदपत्रे तपासल्यानंतर लग्न डिसेंबर २०२० मध्येच रद्द झाल्याचा मुद्दा लक्षात घेतला. या प्रकरणात तपास सुरु आहे. पण कोर्टाने मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

loading image