

Data Center land purchase Deal
ESakal
सुजित गायकवाड
नवी मुंबई : येथील एमआयडीसीत उभारल्या जाणाऱ्या हायपरस्केल डेटा सेंटर्सना प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यापूर्वीच विरोध होत आहे. या प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या पाणी, वीज आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करीत माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी एमआयडीसीला पत्र पाठवून अशा प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली आहे.