esakal | दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पालघरमध्ये सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कडाडून टीका केलीये. 

सध्याचं सरकार फक्त सोयीसाठी आलेलं सरकार

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. भाजप म्हणजे सत्तर टक्के मिळवलेला विद्यार्थी आहे. तर महाविकास आघाडी म्हणजे चाळीस चाळीस टक्के एकत्रित करून सत्तेत आलेला पक्ष आहे असं देखील फडणवीस म्हणालेत. महाराष्ट्रातील सध्याचं सरकार फक्त सोयीसाठी आलेलं सरकार आहे. या सरकारला मंत्रिमंडळ देखील बनवता आलं नाही. एक महिना मंत्रिमंडळ न बनवण्याची नामुष्की या सरकारवर आलीये. अशा प्रकारचं सरकार फार काळ टिकणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी बोलून दाखवला.  

मोठी बातमी : विना-अनुदानित सिलिंडर महागला  

तिन्ही पक्षात नाराजी 

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून नाराज आहेत. याचसोबत राष्ट्रवादीचा आमदार तर राजीनामा द्यायला निघाले होते. तर कॉंग्रेसने तर आपल्याच पक्षाचं कार्यालय फोडलं. अशी अवस्था सुरवातीलाच असेल तर महाराष्ट्रात हे सरकार टिकूच शकत नाही असंही फडणवीस म्हणालेत.  

कर्जमाफीचा शब्द नरेंद्र मोदींच्या जीवावर दिला का ?

हे सरकार बेईमानी करून तयार झालेलं सरकार आहे. आम्ही काळजीवाहू सरकार असताना, मर्यादित अधिकार असताना देखील शेतकर्यांना निधी देऊ केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु असताना, राज्यपालांनी प्रती हेक्टरी आठ हजार तर फळ बागांना प्रती हेक्टरी 18 हजार रुपये देऊ केले. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रती हेक्टरी देण्याचा शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रती हेक्रती देतो सांगून हातात भोपळा दिला. नुकतंच चक्रीवादळ देखील आलेलं, त्यामध्ये अनेक मच्छीमार बांधवांचं नुकसान झालं. त्यांना देखील कोणतीच मदत सरकारने केलेली नाही. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्याकडे पैसे मागत असल्याचं सांगतायत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द नरेंद्र मोदींच्या जीवावर दिला का ? असा खडा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. 

मोठी बातमी : येत्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळतील 'या' युक्त्या, 'हे' वेगवेगळे प्रयोग..

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणीन असं बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं होतं. ते वचन म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर करीन असं होतं का ? हा ही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. आज बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात काय वाटत असेल ?

यांचा राजकीय सात बारा जनतेने कोरा करावा 

आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी सांगितली नसताना दिली, मात्र या सरकारने जनता आणि शेतकऱ्यांशी बेईमानी केलीये. यांचा राजकीय सात बारा महाराष्ट्राच्या जनतेने कोरा करायला हवा असं आवाहन देवेद्र फडणवीस यांनी केलं. 

WebTitle: former maharashtra CM targets uddhav thackeray shivsena and mahavikas aaghadi in palghar