विना-अनुदानित सिलिंडर महागला

विना-अनुदानित सिलिंडर महागला

नव्या वर्षाला बातमी तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत. वर्ष 2020 सुरु झालंय. अशात वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण रोज वापरत असलेला सिलिंडर महागलाय. 

आजपासून विना अनुदानित सिलिंडरचे दर वाढलेत. ऑगस्ट महिन्यापासून विनानुदानित सिलिंडरमध्ये तब्बल 140 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे मुंबईत आता सिलिंडरची किंमत 684.50 रुपये प्रती सिलिंडर तर दिल्लीत 714 रुपये प्रती सिलिंडर झालंय. दरवर्षी आपल्याला 14.2  किलोच्या 12 सिलिंडरवर अनुदान मिळते. त्या अतिरिक्त सिलिंडर बाजार भावाने विकत घावे लागतात.

लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) चे दर 01-01-2020 म्हणजेच आजपासून बदलले आहेत. दर महिन्यात सिलिंडरचे दर वाढतायत. आज करण्यात आलेली दरवाढ ही पाचव्या महिन्यात सलग झालेली दरवाढ आहे. दिल्ली आणि मुंबईत अनुक्रमे एकोणीस रुपये पन्नास पैसे(19.50) आणि एकोणीस(19) रुपये दर वाढलेले पाहायला मिळतायत. 

इंडियन ऑइलच्या माहितीनुसार मुंबई आणि दिल्ली सोबत कोलकाता आणि चेन्नईमध्ये देखील LPG सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ झालीये. कोलकातामध्ये 21.5 रुपये तर चेन्नईमध्ये 20 रुपयांनी सिलिंडर महागलाय. त्यामुळे कोलकातामध्ये  विनानुदानित सिलिंडर 747 रुपये तर चेन्नईमध्ये विना अनुदानित एका सिलिंडरची किंमत 734 रुपये झालीये. 

मेट्रो शहरातील सिलिंडरचे नवीन दर आणि जुने दर  

शहर  नवीन दर  जुने दर 
दिल्ली  714  695
कोलकाता  747 725.5
मुंबई  684.50 665
चेन्नई  734 714

इंडियन ऑइलच्या माहितीनुसार एक डिसेंबर 2019 मध्येच 19 किलो सिलिंडरच्या किमती देखील वाढल्यात. मुंबईत मोठ्या सिलिंडरचे दर 1,241 प्रती सिलिंडर झालेत. तर दिल्लीत मोठ्या सिलिंडर चे दर 1,190 झालेत.

WebTitle : non subsidised LPG rates increased in all metro cities

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com