esakal | Coronavirus : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Former MP Anand Paranjape tests positive for Covid-19

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉजिटिव्ह येत आहेत. अशात राष्ट्रवादीचे एका मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. या नेत्याच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे.

Coronavirus : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉजिटिव्ह येत आहेत. अशात राष्ट्रवादीचे एका मोठ्या नेत्याला आणि माजी खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे. या नेत्याच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांपासून हा नेता अनेकाच्या संपर्कात होता. या नेत्याच्या संपर्कातील जवळपास १५ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी, घरातील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Coronavirus : मेघालयात कोरोनाचा पहिला बळी; डॉक्टरचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्या अधिकाऱ्यासोबत कायदा सुव्यवस्थेसंबंधी चर्चा केली होती. पण गेल्याच आठवड्यात या पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. या पोलिस अधिकाऱ्यावर तबलिगी जमाच्या सदस्यांची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. अधिकाऱ्याने १३ बांगलादेशी आणि आठ मलेशियाचे अशा एकूण २१ जणांना नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस अधिकाऱ्याला लागण झाल्याचं समोर येताच ठाणे महापालिकेकडून संपर्कात आलेल्या १०० जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रावादीचे नेते, पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि काही इतरांचा समावेश होता. प्राथमिक रिपोर्टमध्ये दोन पत्रकार, तीन पोलिस कर्मचारी आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याशी संबंधित १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

loading image