ऐकीव माहितीवर अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले - परमबीर सिंग | Parambir singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir-Singh-Anill-Deshmukh

ऐकीव माहितीवर अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले - परमबीर सिंग

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी चांदिवाल चौकशी आयोगाला (Chandiwal commission) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप आपण ऐकलेल्या गोष्टींवर केले, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी कॉमरासमोर साक्षीदार म्हणून हजर राहण्यास नकार दिला आहे. म्हणजे परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपांसाठी पुरावे नाहीत. फक्त ऐकीव माहितीवर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर हे आरोप केले आहेत.

सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. हे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यात वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले होते. एकूणच या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल चौकशी आयोगाची स्थापना केली होती.

हेही वाचा: पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा लवकरच सुरू होणार? राजेश टोपे म्हणाले...

या आयोगासमोर हजर होण्यासाठी परमबीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले. पण ते हजर झाले नाहीत. आता त्यांनी आपण फक्त ऐकीव गोष्टींवर हे सर्व आरोप केल्याचा खुलासा केला आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे पुरावे नाहीत. अनिल देशमुखही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा: दिल्ली प्रदुषणावर सरकार काहीच करत नाही : सर्वोच्च न्यायालय

परमबीर सिंह कुठे आहेत? त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली. पुढच्या ४८ तासात सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहेत असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.

loading image
go to top