Primary School Reopen| पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा लवकरच सुरू होणार? राजेश टोपे म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा लवकरच सुरू होणार? राजेश टोपे म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यापैकी पाचवीपासून पुढील वर्गाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा लवकरच (Maharashtra Primary School Reopen) सुरू होण्याची शक्यता आहे. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी तसे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: शाळा सुरू, पण शाळेत नेणारी एसटी बंद

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी, अशी टास्क फोर्सने माहिती दिली आहे. पहिली ते चौथी सुरू करायला अजिबात हरकत नाही, असं सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यात ९८ टक्के रिकव्हरी रेट आहे. मुलं गंभीर स्वरुपात आजारी पडल्याचे प्रमाण कुठेही दिसले नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याची काळजी नाही. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाला योग्य काळजी घेऊन शाळा सुरू कऱण्याची परवानगी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत मुख्याध्यापकाच्याद्वारे पालकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू. याबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात दररोज ७०० ते ८०० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. तसेच रिकव्हरी रेट देखील चांगला. कोव्हॅक्सिन लस मुलांना देण्यास काही अडचण नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. राज्यात लशीची उपलब्धता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी द्यावी. मुलांच्या लसीकरणासाठी आम्ही तयार आहोत. पहिली ते चौथीपर्यंत काही अटी-शर्तीवर शाळा सुरू करायला पाहिजे, असंही टास्क फोर्सने सांगितलं. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा देखील शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव आहे. तसेच राज्य सरकार देखील शाळा सुरू करण्याच्या विचारात आहे, असं टोपे म्हणाले.

loading image
go to top