माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंह मुंबईत दाखल | Parambir singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंह मुंबईत दाखल

मुंबई: मागच्या काही महिन्यांपासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. "सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) आदेशानुसार, तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. मला जे काही म्हणायचय ते कोर्टात म्हणेन" असे परमबीर सिंह यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये होते. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत, त्याच्या तपासामध्ये ते सहकार्य करतील. स्वत: परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: प्रथम महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा! Sweden

मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात माहिती दिली होती. ४८ तासात सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहेत असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.

loading image
go to top