

Mahesh Sukhramani Quits BJP
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरच्या तापलेल्या राजकारणात अखेर संतापाचा ज्वालामुखी फुटला. भाजपचे माजी ज्येष्ठ नेते महेश सुखरामानी यांनी पक्षत्याग करून थेट टीम ओमी कलानीचा झेंडा हाती घेतल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयात त्यांच्या फोटोंवर काळी शाई फासून प्रचंड निषेध नोंदवला. अनेक वर्षे पक्षाला दिलेल्या सेवेनंतर अचानक झालेले हे "धोरणात्मक वळण" भाजप कार्यकर्त्यांना पचनी पडत नाहीये आणि त्याचीच ठिणगी भाजपा कार्यालयात भडकताना पाहायला मिळाली.