
डोंबिवली : गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा क्षेत्रात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विद्यमान खासदारांनी गेल्या वर्षभरात इतकी विकासकामे केली असतील तर ती दाखवून द्यावी, आपण त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी केलेल्या त्या दाव्याची खिल्ली उडवली.