किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजीराजेंकडून घोडबंदर किल्ल्याची पाहणी

godbandar killa
godbandar killa

भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची आज दुर्दशा झाली आहे. हे गड किल्ले आपली संपत्ती आहेत. त्याच्या संवर्धनासाठी फोर्ट फाऊंडेशन उभारण्याचा प्रयत्न असून त्यातून अशा गड किल्ल्यांच्या संवर्धनात हात भर लावला जाणार आहे अशी माहिती घोडबंदर किल्ल्यावर सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली. जर राज्यातील आमदार आणि खासदारांनी राजाचे हे गड दत्तक घेऊन पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्याची डागडुगी केल्यास पुन्हा एकदा छत्रपतींचे त्या काळातले काम लोकापर्यंत पोहोचविता येईल असे गुरुवारी घोडबंदर किल्यावर आलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. गुरुवारी घोडबंदर किल्ल्यावरील सुशोभिकरणाच्या कामाची छत्रपती संभाजी राजे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. 

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन विभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर यांनी बैठक घेऊन घोडबंदर किल्ल्याजवळ 'शिवसृष्टी' प्रकल्पाला आवश्‍यक परवानग्या व निधी देण्यास मंजुरी दिली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खात्यातून नुकतेच 'शिवसृष्टी' साठी 5 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. घोडबंदर येथील प्रस्तावित 'शिवसृष्टी'साठी राज्य सरकारकडून 5 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले असून या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी घोडबंदर किल्ल्याला भेट दिली. यावेळी पालिकेचे बांधकाम अभियंता दीपक खांबित यांनी त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली.

(संपादन : वैभव गाटे)

Fort Foundation to be set up for conservation of forts Chhatrapati Sambhaji Raje

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com