Mumbai : मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक गोडबोले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक गोडबोले यांचे निधन

मुंबई : मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक, शतकवीर आप्पासाहेब गोडबोले यांचे आज सकाळी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय १०१ वर्षे होते.

मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत आप्पासाहेब मुंबई ग्राहक पंचायतीशी खुप जवळून जोडले गेले होते. संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांचे आप्पासाहेब हे स्फुर्तीस्थान होते. संस्थेने गेल्या ४७ वर्षांत केलेल्या गौरवास्पद वाटचालीबद्दल ते नेहेमीच कार्यकर्त्यांचे कौतुक करत आले.‌ भरभरुन आनंदी जीवन जगण्याचे आणि दुसऱ्यांनाही आनंद देण्याचे आप्पासाहेब हे एक आदर्श प्रारुप होते.

आप्पासाहेबांच्या जाण्याने संस्थेतील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाला आणि कौतुकाला मुकणार असले तरी त्यांनी रुजवलेली मुल्याधिष्टीत विचारसरणी सर्वांच्याच कायम लक्षात राहील. आप्पासाहेबांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मुंबई ग्राहक पंचायतीचा परीवार सहभागी असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले

टॅग्स :Mumbai NewsMumbai