STच्या स्मार्ट कार्ड योजनेला चार महिन्याची मुदतवाढ, परिवहन मंत्र्यांची घोषणा

STच्या स्मार्ट कार्ड योजनेला चार महिन्याची मुदतवाढ, परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड  योजनेला यापूर्वी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता सध्याच्या कोरोना महामारी लक्षात घेऊन स्मार्ट कार्ड योजनेला पुढच्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. 

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने, तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नाही.

त्यामुळे ज्या प्रवाशांची नोंदणी किंवा स्मार्ट कार्ड मिळाले नसतील त्यांना  31 मार्च पर्यंतच स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेता येणार असून, यादरम्यान ज्या मार्गावर एसटी बसेस सुरू आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.  

1 एप्रिलपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक

एसटीतील प्रवासी सवलत योजना सुलभ होण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना एसटीने आणली आहे. दरम्यान दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या  महामारीमुळे स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, पुढच्या वर्षात 1 एप्रिलपासून स्मार्ट कार्ड राज्यात बंधनकारक राहणार आहे.

सध्या प्रचलित पद्धतीनेच ज्येष्ठांना सवलत

स्मार्ट कार्ड योजना अद्याप राज्यात पूर्णपणे कार्यान्वित झाली नसल्याने 31 मार्च पर्यंत महामंडळातील प्रचलित पद्धत म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड, मतदान कार्ड बघून ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात सवलत मिळवता येणार असून, तशा सूचना सुद्धा महामंडळाने विभाग नियंत्रकांना दिल्या आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

Four month extension ST smart card scheme Transport Minister announces

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com