मुंबईनजीकच्या 'या' मोठ्या शहरासाठी मागवणार 4 हजार अँटिजेन किट्स...

मुंबईनजीकच्या 'या' मोठ्या शहरासाठी मागवणार 4 हजार अँटिजेन किट्स...

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात लॉकडाऊन काळात कोरोना रुग्णांची संख्या ही दररोज सरासरी दोनशेच्या आसपास वाढत आहे. ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी 70 स्वयंसेवकांच्या मदतीने घरोघरी जाऊन 'चेस दि कोरोना पेशंट्स' ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत 4 हजार अँटिजेन कोरोना टेस्ट किट्स मागवण्यात येणार असून, पालिकेचे स्वतंत्र असे 150 ऑक्सिजन बेड्सचे कोविड रुग्णालयात उभारण्यात येणार असल्याची माहित पालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. 

पालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांची फरफट होते. ऑक्सिजनअभावी काही रुग्ण अतिगंभीर अवस्थेत पोहचत असल्याच्या, रुग्ण दगावल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर मात करण्यासाठी येत्या आठवड्यात 150 ऑक्सिजन बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असे आयुक्त राजा दयानिधी यांनी सांगितले.

कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी विलंब लागतो. यामुळे चार हजार अँटिजेन टेस्ट किट्स मागवण्यात आल्यामुळे अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट हातात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमार्फत अवाजवी बिल रुग्णांकडून वसूल केली जात आहेत, त्यासाठी दक्षता पथक सज्ज करण्यात आल्याचे डॉ. दयानिधी यांनी सांगितले. यावेळी महापौर लीलाबाई आशान, सभागृह नेते राजेंद्र चौधरी, शिवसेना नगरसेवक अरुण आशान, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे उपस्थित होते.

( संकलन - सुमित बागुल ) 

four thousand covid antigen kits will be order for testing in ulhasnagar


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com