BIG NEWS - मुंबईतील कोरोना दोन आठवड्यात आटोक्यात येणार, पुण्यातील कोरोना आटोक्यात येण्यास लागणार...

सुमित बागुल
Saturday, 18 July 2020

मुंबईकरांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कारण लवकरच मुंबईतील कोरोना आटोक्यात येणार आहे

मुंबई - मुंबईकरांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कारण लवकरच मुंबईतील कोरोना आटोक्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, यांना कुणी सांगितलं की सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या मुंबईतील कोरोना कधी आटोक्यात येणार ते ? बरं कोरोना आटोक्यात येणार असेल तर दिवस किती लागतील? तर ही बातमी पूर्ण वाचा आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा.. 

लेव्हिट्स मेट्रिक्स गणितीय पद्धतीने मांडलाय अहवाल 

टीव्ही रिपोर्टनुसार IIT Bombay मध्ये गणितीय ठोकताळ्यांचा अभ्यास केल्यानंतर एक महत्वाचा अहवाल मांडला गेलाय. यामध्ये येत्या दोन आठवड्यात मुंबईतील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात येणार असल्याचं नमूद केलंय. मात्र, मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण राज्यातील कोरोना आटोक्यात येण्यास पुढील दोन महिने लागणार असल्याचंही नमूद केलंय. लेव्हिट्स मेट्रिक्स गणितीय पद्धतीने मुंबई आयआयटीने हा अहवाल मांडलाय. 

मोठी बातमी - UGC च्या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टात धाव, अंतिम वर्षाच्या परिक्षेचा तिढा सर्वोच्च न्यायालयात

काय म्हणतेय मुंबई महापालिका ?

गेल्या काही दिवसात मुंबईत साधारण बाराशे ते तेराशे किंवा कधी त्याहीपेक्षा कमी रुग्ण आढळून येतायत. मात्र आता पुण्याने कोरोना रुग्णसंख्येत मुंबईला मागे टाकलंय. पुण्यात दिवसाला साधारण पंधराशे रुग्ण आढळून येतायत. अशात मुंबई महापालिकेच्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसात मुंबईत जे कोरोना रुग्ण आढळून येतायत त्यांच्यामध्ये लक्षणं आढळणारे रुग्ण कमी आहेत. म्हणजेच मुंबईतील असिम्टमॅटिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोना परिस्थिती निवळेल असा महापालिकेचा देखील अंदाज आहे. 

मुंबईचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 

देश आणि राज्याच्या तुलनेत मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट हा तब्बल ७० टक्के आहे. देशाच्या रिकव्हरी रेटच्या तुलनेत मुंबईतील रिकव्हरी रेट ७ टक्के जास्त आहे. तर महाराष्ट्राच्या रिकव्हरी रेटच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्के जास्त आहे.  

iit bombay speculates that within two weeks corona will vanish from mumbai 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iit bombay speculates that within two weeks corona will vanish from mumbai