esakal | विविध मागण्या घेऊन आरोग्यसेविका मातोश्रीवर धडकणार; मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणं मांडणार
sakal

बोलून बातमी शोधा

विविध मागण्या घेऊन आरोग्यसेविका मातोश्रीवर धडकणार; मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणं मांडणार
  • किमान वेतन, पालिका कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी आरोग्यसेविक आक्रमक झाल्या आहेत.
  •  21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

विविध मागण्या घेऊन आरोग्यसेविका मातोश्रीवर धडकणार; मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणं मांडणार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : किमान वेतन, पालिका कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी आरोग्यसेविक आक्रमक झाल्या असून 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

डोंगरी येथून सव्वा कोटींच्या एमडीसह महिलेला अटक; पावणे नऊ लाखांची रोखही जप्त

मुंबई महापाकिलेत चार हजाराहून अधिक आरोग्यसेविका 18 ते 20 वर्षांपासून कार्यरत आहेत.  तेव्हापासून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.  किमान वेतन द्या , भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन मिळावे , पालिका कर्मचारी म्हणून मान्यता द्या, सन्मानाने वागणूक द्या, 2016 नेमलेल्या सीएचव्ही ना पहिल्या तारखे पासून कायम करा व त्यांना 2016 पासून भाऊबीज भेट द्या अशा प्रमुख मागण्या आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही जिवाची परवा न करता कोविड  विरूद्ध लढतो आहोत. मात्र आमच्या वर घोर अन्याय होत असल्याचे आरोग्यसेविकांचे म्हणणे आहे. महानगपालिकेतील चार हजार आरोग्यसेविकांच्या कुटूंबाची यामुळे फरफट सुरू आहे. प्रशासनासोबत अनेक वेळा  चर्चा झाल्या. अनेक आश्वासने मिळाली. मात्र न्याय मिळत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय़ घेतला असल्याचे महापालिका आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड प्रकाश देवदास यांनी सांगितले.
Four thousand health workers will went to Matoshri

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top