Lockdown : चेंबूर परिसरातील चौदाशे मजूर ओडिसाला रवाना

train
train

चेंबूर : चेंबूर येथील माहुल परिसरातील रिफायनरीज मध्ये रोजंदारीवर काम करणारे 1400 मजूर आपल्या गावी ओडिसाला रवाना झाले. यावेळी त्यांनी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारचा जयजयकार केला. माहुल गावात एचपीसीएल, बीपीसीएल, टाटा पॉवर कंपनीत काम करणारे हे मजूर ओडिसाच्या बेहरामपूर जिल्ह्याचे रहिवासी होते.

लॉकडॉउनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम नसल्याने तसेच ठेकेदाराने पगार न दिल्याने त्यांची उपासमार झाली होती. याबाबत खासदार राहुल शेवाळे यांना माहिती दिली असता त्यांनी मुख्यमंत्री व केंद्र सरकारच्या माध्यमातून या कामगारांना आपल्या गावी परतण्याकरिता लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सायंकाळी 5 वाजता मुंबई-ओडिसा रेल्वे सोडली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत देसाई, आर. सी. एफ आणि ट्रोम्बे पोलिस ठाण्याचे सर्व अधिकाऱ्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून कामगारांना निरोप दिला.

Fourteen hundred laborers from Chembur area sent to Odisha

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com