esakal | सर्वात मोठी बातमी ! मुंबई पुण्यात चौथा लॉकडाऊन? स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत संकेत...
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वात मोठी बातमी ! मुंबई पुण्यात चौथा लॉकडाऊन? स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत संकेत...

मे महिन्याच्या अखेरपर्यंत काळजी घेत आपल्याला या व्हायरसचा प्रार्दुभाव रोखायचा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणखी काही काळासाठी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिलेत.

सर्वात मोठी बातमी ! मुंबई पुण्यात चौथा लॉकडाऊन? स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत संकेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या जगभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यात देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. देशातील कोरोनाबाधिताचा आकडा काही केल्या कमी होत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. 3 मेनंतर 17 मे रोजीपर्यत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आहे. मात्र यानंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत काळजी घेत आपल्याला या व्हायरसचा प्रार्दुभाव रोखायचा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणखी काही काळासाठी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिलेत. गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली आहे. तसंच या कोरोनाला रोखण्यासाठी आपण एकत्र येऊन हे संकट दूर करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

यंदा परीक्षा होणार का नाही ? आज लागणार परीक्षांचा निकाल... 

या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कोरोनाच्या लढ्यात आम्ही राज्य सरकारसोबत असल्याचं म्हटलंय. या बैठकीत सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे. 

एक्झिट प्लॅनचं काय? - राज ठाकरे

लॉकडाऊन संदर्भात सरकारनं एक्झिट प्लॅन तयार केला आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी सरकारवर उपस्थित केला. कधीतरी लॉकडाऊन काढवाच लागणार आहे. कोरोनावर लस येईपर्यंत लॉकडाऊन असेल असंही नाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याआधी 10 ते 15 दिवस आधी सांगणं आवश्यक असून काय होणार, कोणत्या गोष्टी सुरु होतील याची माहित नागरिकांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं एक्झिट प्लॅन राज्यासमोर लवकरात लवकर ठेवावा, असं राज ठाकरेंनी काल झालेल्या बैठकीनंतर म्हटलं आहे.

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"

राज्य लवकरच ग्रीन झोनमध्ये दिसलं पाहिजे - मुख्यमंत्री 

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी कठोर निर्णय घेऊन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसंच महाराष्ट्र राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस पर्याय करुन रिझल्ट दिसला पाहिजे, अशा सूचना सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसे येतील ते पाहावं अशी ताकीदचं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. 

ग्रीन आणि ऑरेन्ज झोनची काळजी घ्या

3 मेपासून ग्रीन आणि ऑरेन्ज झोनमध्ये काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करण्यात आलेत. पण याठिकाणी पुन्हा रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

loading image
go to top