esakal | यंदा परीक्षा होणार का नाही ? आज लागणार परीक्षांचा निकाल... 
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा परीक्षा होणार का नाही ? आज लागणार परीक्षांचा निकाल... 

लाॅकडाऊनमुळे राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परिक्षा रखडल्या आहेत. यासंदर्भात नियुक्त केलेल्या कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

यंदा परीक्षा होणार का नाही ? आज लागणार परीक्षांचा निकाल... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  लाॅकडाऊनमुळे राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परिक्षा रखडल्या आहेत. यासंदर्भात नियुक्त केलेल्या कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. तसेच, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली असून परीक्षांबाबतचा निर्णय शुक्रवारी (ता. 8) दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे.

Big News - दहावी आणि बारावीच्या निकालांबाबत मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल...

महाविद्यालय व विद्यापिठांच्या रखडलेल्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, या विद्यापीठांचे कुलगुरू तसेच  उच्च शिक्षण विभागाचे संचालक यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

केंद्राचा हस्तक्षेप, राज्यांना ताप; कोरोनाच्या लढाईत येतायत अडचणी ?

विद्यापीठ अनुदान आयोगाने परिक्षांबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर या समितीनेही आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालातील शिफारशीनुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शुक्रवारी दुपारी 1 वाजता विद्यापीठे आणि महाविद्यालयीन परिक्षांबाबत निर्णय जाहीर करणार आहेत.

university exams decision will be taken today by uday samant read full news

loading image