esakal | 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद, पहिला छायाचित्रित पुरावा आला समोर

बोलून बातमी शोधा

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद, पहिला छायाचित्रित पुरावा आला समोर}

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या परिक्षेत्रात  गेल्या पाच वर्षापासून सातत्यपूर्ण कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात येत आहे.

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद, पहिला छायाचित्रित पुरावा आला समोर
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई,ता. 9 : बोरिवलीतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद झाली आहे. वन विभागाला कोल्ह्यांची छायाचित्रे टिपण्यास यश मिळाल्याने राष्ट्रीय उद्यानात कोल्ह्यांचा अधिवास असल्याचा पहिला छायाचित्रीत पुरावा मिळाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उद्यानातील नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्यांचे दर्शन झाले.

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात प्रथमच कोल्ह्यांच्या वावराचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधून यापूर्वी जखमी कोल्ह्याचा बचाव करण्यात आला होता. तसेच अनेकांनी या परिसरात कोल्ह्यांच्या वावराची नोंद केली होती. परंतु, राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्याच्या अधिवासाचा छायाचित्रित पुरावा यापूर्वी कधीही टिपण्यात आला नव्हता. 

महत्त्वाची बातमी : अर्जुन रामपालच्या मुंबईतील खार मधील घरात छापेमारी केल्यानंतर NCB ला ड्रग्स देखील आढळून आले होते

मु्ंबईतील कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. कोल्ह्यांचा वावर जंगल, गवताळ प्रदेश, कांदळवन, शेत जमिनी आणि शहरी अधिवासातही आढळतो. विक्रोळी, नवी मुंबई, पूर्व उपनगरातील गोराई - मनोरी आणि अंधेरी लोखंडवाला भागातील कांदळळवन आसपासच्या परिसरात कोल्ह्यांचा वावर समोर आला आहे.

23 डिसेंबर रोजी तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्याचे दर्शन झाले. तुळशी वनपरिक्षेत्रात गस्तीच्या दरम्यान गाडीच्या समोरून जाणाऱ्या कोल्ह्याचा व्हिडीओ वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उद्यानाच्या नागला आणि तुळशी वनपरिक्षेत्रात कोल्ह्याचा वावर कॅमेऱ्यात टिपण्यात आल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी  दिली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील कोल्ह्यांचा वावर कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्याने त्यांच्या उद्यानातील अधिवसावर शिक्कामोर्तब झाले आहे. वर्सोवा खाडीपलीकडे राष्ट्रीय उद्यानाचे 1 हजार 592 हेक्टर क्षेत्रावर परसलेले नागला वनपरिक्षेत्र आहे. कांदळवनाला लागून हे परिक्षेत्र असल्याने कांदळवनांमधूनच हा कोल्हा याठिकाणी आल्याची शक्यता पवार यांनी वर्तवली. मात्र, तुळशी वनपरिक्षेत्रात दिसलेल्या कोल्ह्याविषयी अंदाज बांधणे कठीण असल्याचे  त्यांनी सांगितले.

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या परिक्षेत्रात  गेल्या पाच वर्षापासून सातत्यपूर्ण कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात येत आहे. मात्र, प्रथमच आम्हाला राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत कोल्ह्याचे छायाचित्र टिपण्यात यश मिळाले आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील कोल्ह्याच्या वावराचा हा पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे असं  वनसंरक्षक (संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) जी. मल्लिकार्जुन म्हणालेत.  

fox spotted at sanjay gandhi nation park official photo captured in cameras put in the park