esakal | बेड मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक

बोलून बातमी शोधा

Hospital Bed Crime
बेड मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शहरात बेड्सची कमतरता जाणवू लागतेय. अशातच बेड मिळवून देण्याची नावाखाली पैसे उकळणाऱ्या मुंबईतून अटक करण्यात आली आहे. कोरोना काळात नागरिकांना नामकिंत रुग्णालयात आयसीयू बेड मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित तक्रारदार महिला आणि तिची बहिण परदेशात नामकिंत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार महिलेच्या आईला कोविड हा संसर्ग रोग झाला होता. तिच्यावर NACI वरळी सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने ऑक्सिजन बेडची गरज होती.

हेही वाचा: मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

तक्रारदार महिलेला तिच्या परदेशातील बहिणींकडून आरोपी हा ऑक्सिजन बेड किंवा आयसीयूमध्ये बेड उपलब्ध करून देतो असे कळवले. त्यानुसार तक्रारदार महिलेने आरोपी समशु उस्मानी यांना फोन केला. त्यावेळी उस्मानीने बेडच्या नावाखाली काही पैसे उकळून तक्रारदार महिलेच्या आईला इमरजन्सी वॉर्डमध्ये एडमिट करून घेतले. तसेच उर्वरित पैशांसाठी तगादा लावला. उर्वरित पैसे न मिळाल्यास आईला बेड खाली करायला लावू अशा धमक्या देऊ लागला.

दरम्यान डॉक्टरांकडून तिची आई आयसीयूमध्ये नसून इमरजन्सी वॉर्डमध्ये असल्याचे कळाले. तसेच आयसीयू बेड न मिळाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल असे सांगितले. पीडित महिलेच्या आईला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या आईचे २० एप्रिलला मृत्यू झाला. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर वांद्रे पोलिसांनी उस्मानीला अटक केली आहे.

fraud in name of getting bed one arrested by police