सावधान...! भामट्यांकडून फसवणुकीची नवी स्टाईल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

विमा पॉलिसीचा हप्ता तातडीने भरल्यास हप्त्याची रक्कम कमी होईल, असे असे प्रलोभन दाखवत 63 वर्षीय डॉक्‍टर आणि त्यांच्या पत्नीची भामट्याने 3 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठाणे : विमा पॉलिसीचा हप्ता तातडीने भरल्यास हप्त्याची रक्कम कमी होईल, असे असे प्रलोभन दाखवत 63 वर्षीय डॉक्‍टर आणि त्यांच्या पत्नीची भामट्याने 3 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाचा सविस्तर : संपत्तीपेक्षा आई-वडिलांचा सन्मान अधिक महत्त्वाचा : न्यायालय

ठाण्यात राहणाऱ्या एका डॉक्‍टर दाम्पत्याने पाच वर्षांपूर्वी विमा पॉलिसी काढल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये त्यांना मोबाईलवर एका व्यक्तीने संपर्क साधत विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. पॉलिसीचा हप्ता तातडीने भरल्यास हप्त्याची रक्कम कमी होईल, असे सांगण्यात आले.

त्या व्यक्तीने दाम्पत्याला उत्तर प्रदेशमधील बॅंक खात्याचा क्रमांक देउन त्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवत डॉक्‍टरने 11 आणि 12 फेब्रुवारीला अनुक्रमे 1 लाख 42 हजार 827 रुपये आणि 2 लाख 31 हजार 102 रुपये पाठवले. 

चिंताजनक : महाराष्ट्र, यूपी, एमपीतील 80 टक्के ऑनलाईन प्रेक्षक हे युवावर्गातील

मोबाईलवर याबाबत संदेश आल्याने विमा कंपनीला पैसे पोहचले, असा डॉक्‍टरचा समज झाला. परंतु एकत्रित पैसे भरूनही त्यांच्या बॅंक खात्यातून पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम कपात होत होती. तर काही दिवसांपूर्वी डॉक्‍टरला विमा कंपनीने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पॉलिसीचे पैसे कधी भरणार, अशी विचारणा केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे डॉक्‍टरच्या लक्षात आले. 

'ती' रक्कम सुलतानपूरमधील बॅंकेत जमा 
   डॉक्‍टर दाम्पत्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर डॉक्‍टरची भामट्याने ज्या दूरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधून फसवणूक केली त्याची 'सायबर क्राईम पोर्टल'वर पाहणी केल्यांनतर ती रक्कम उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथील एका बॅंकेतील खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in the name of insurance policy