महाराष्ट्र, यूपी आणि एमपीतील ८० टक्के ऑनलाईन प्रेक्षक हे युवावर्गातील 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

हॉटस्टार च्या अभ्यासातून असे दिसून आले की मनोरंजन मंचाचा उपयोग करणाऱ्यांमध्ये ४६ टक्के महिलांचा समावेश  

मुंबई - हॉटस्टारच्या रिपोर्ट नुसार टिअर २ आणि टिअर ३ शहरांतून ऑनलाईन मनोरंजनाचा वापर सातत्याने वाढतांना दिसत आहे.  नुकताच या आघाडीच्या ओटीटी मंचाकडून ‍ हिंदी भाषिक प्रदेशामध्ये सर्वेक्षण करण्यात आले,  यांतून असे दिसून आले की तरूणाई प्राधान्य देत असलेल्या विभागांत- नाट्य- रिॲलिटी, त्यानंतर रोमान्स, साहस, पौराणिक आणि त्यानंतर पारिवारिक कार्यक्रमांचा समावेश आहे.  

त्यानंतर रिपोर्टमध्ये हे ही नमूद करण्यात आले आहे की महानगरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील तरूणाईही मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आणि स्थानीय कंटेंटचा वापर करत आहे. हॉटस्टारने आता अशा छोट्या शहरांतील प्रेक्षकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे ज्यांना गुणवत्तापूर्ण कंटेंट मोफत उपलब्ध होऊ शकेल.  

मोठी बातमीधारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

  • भारतातील तरूणाईच्या सर्वाधिक आवडत्या विभागात नाट्य आणि रिॲलिटी चा समावेश आणि त्यानंतर रोमान्स, साहस, पौराणिक आणि पारिवारीक कार्यक्रमांचा समावेश  आहे. 
  • महाराष्ट्रातील तरूण पुरूषांनी यूपी आणि एमपी च्या तुलनेत दिले अन्य विभागांपेक्षा विनोदाला प्राधान्य
  • तर यूपी तील तरूण महिला देतात रोमान्स आणि साहसी कार्यक्रमांपेक्षा नाट्यमय कार्यक्रमांना प्राधान्य
  • पुरूषांच्या बरोबरीने महिला सुध्दा पाहतात अधिक प्रमाणात साहसी कंटेंट, अधिकाधिक महिला त्यांच्यासाठी वेळ काढू लागल्या आहेत.

मोठी बातमी  - देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यात 'तीन' मागण्या, म्हणालेत मंत्रिमंडळ बैठकीत 'हे' निर्णय घ्या

या अभ्यासातून अनेक बाबी समोर येत असून भारतातील महिला या अधिकाधिक ऑनलाईन एन्टरटन्मेंट कंटेंटचा वापर करत असतांनाच त्या पुरूषांच्या बरोबरीने साहसी कंटेंटही पहात आहेत. यूपीमधील तरूण महिला या रोमान्स व साहसी विभागाच्या तुलनेत नाट्याला प्राधान्य देत आहेत.  अधिकाधिक महिला आता त्यांच्यासाठी वेळ काढू लागल्या आहेत.  त्याचबरोबर महाराष्ट्रातील तरूण पुरूष हे यूपी आणि एमपीच्या तुलनेत विनोदाला अधिक प्राधान्य देतांना दिसून आले आहेत.

या अभ्यासाविषयी माहिती देतांना हॉटस्टार चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर वरूण नारंग यांनी सांगितले “ ऑनलाईन मनोरंजनामध्ये वाढ होत असतांना ओटीटी मंचाच्या वाढीची पुढची लाट ही छोट्या शहरांत असेल.  आम्ही विविध भौगोलिक विभागांत मोहिमांवर आधारीत व सातत्याने वैविध्यपूर्ण कंटेंट मध्ये गुंतवणूक करत आहोत.  ४०० दशलक्षांहून अधिक डाऊनलोड्स मुळे हॉटस्टार हे आजमितीस भारतातील सर्वांधिक डाऊनलोडेड ॲप्स पैकी एक बनले आहे.” 

महाराष्ट्रातील टिअर १ आणि २ शहरांतील माहिती खालीलप्रमाणे आहे -

  • महाराष्ट्रात रोमान्स आणि साहसा च्या तुलनेत नाट्य विभागाला प्राधान्य दिले जाते.
  • ७६ टक्के प्रेक्षक हे हिंदी सिरिजला प्राधान्य देतात, महाराष्ट्रातील ७५ टक्के प्रेक्षक हे हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात
  • यूपी आणि एमपी च्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रिॲलिटी शोज पाहिले जातात.
  • महाराष्ट्रातील पुरूषांमध्ये सर्वाधिक प्राधान्य दिला जाणारा विभाग म्हणजे विनोदी होय.

leading OTT provider hotstar on various counsumtion pattern of digital content 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leading OTT provider hotstar on various counsumtion pattern of digital content