Crime News : साखरपुडा एकीशी लग्नगाठ दुसरीशी; नवरदेवाची वरात थेट पोलिस ठाण्यात

डोंबिवलीत राहणारा चार वर्षापूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात पिडीत तरुणीशी ओळख झाली होती.
fraud with two young girls crime engagement marriage groom in police station mumbai
fraud with two young girls crime engagement marriage groom in police station mumbaisakal

डोंबिवली - तरुणीला लग्नाच्या भुलथापा देऊन तिच्याशी साखरपुडा केल्यानंतर लग्न गाठ मात्र दुसरीसोबतच बांधण्याच्या तयारीत तो होता. लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर दुसऱ्या मुलीशी तरुण लग्न करत असल्याचे पिडीत मुलीला समजताच तिने थेट विष्णूनगर पोलिस ठाणे गाठत नवरदेव व त्याच्या आई वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ सुत्र हलवित नवरदेवाला थेट लग्न मंडपातून उचलून पोलिस ठाण्यात त्याची वरात काढल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. सिद्धार्थ शिंदे असे अटक आरोपीचे नाव आहे. डोंबिवलीत राहणारा सिद्धार्थ शिंदे याची चार वर्षापूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात पिडीत तरुणीशी ओळख झाली होती.

त्याने थेट तिचे घर गाठत तिच्या आई वडिलांना सांगून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा दर्शविली. मुलीशी साखरपुडा झाल्यानंतर त्याने तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. यावर मुलीने लग्नाविषयी विचारणा करताच तो लग्नाची बोलणी पुढे करु असे बोलून टाळत असे. पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरीक संबंध देखील प्रस्थापित केले. मात्र सिद्धार्थ हा दुसऱ्याच तरुणीशी लग्न करत असल्याची माहिती पिडीत मुलीला मिळाली होती.

fraud with two young girls crime engagement marriage groom in police station mumbai
Crime News : लग्नाच्या 8 वर्षांनंतर म्हणाला, "माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे! तू स्वतः मर नाहीतर मी मारुन टाकेन"

15 मेला सिद्धार्थची हळद असल्याचे तिला समजले. तिने तिच्या काही नातेवाईकांसह सिद्धार्थचे घर गाठले तेव्हा त्याची हळद असल्याची खात्री तिला झाली. सिद्धार्थचा साखरपुडा पिडीत मुलीशी झाल्याचे माहित असून देखील सिद्धार्थचे आई वडील हे त्याचे दुसरे लग्न लावून देत होते.

fraud with two young girls crime engagement marriage groom in police station mumbai
Crime on Police : वाहनचालकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपावरून दोन वाहतूक पोलिस कर्मचारी निलंबित

हे समजताच पिडीत तरुणीने तात्काळ विष्णूनगर पोलिस ठाणे गाठले. विष्णूनगर पोलिस ठाण्यात सिद्धार्थ आणि त्याच्या आई वडिलांविरोधात तिने तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी काही गोष्टींची खातरजमा करत गुन्हा नोंद करत थेट नवरदेवाचे घर गाठले. सिद्धार्थ याला अटक करत त्याची थेट पोलिस ठाण्यात वरात काढली. त्याला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध पोलिस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com