सिडकोचं घर स्वस्तात देतो सांगितलं, बनावट अलॉटमेंट लेटर दाखवून १.६० कोटींचा चुना; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Fraud Case: सिडकोच्या स्वस्त फ्लॅटचे आमिष दाखवून बनावट अलॉटमेंट लेटर आणि कागदपत्रांच्या आधारे एका कुटुंबाची १.६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : सिडकोच्या मास हाउसिंग योजनेतील फ्लॅट स्वस्त दरात मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने खारघरमधील एका कुटुंबाची एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या टोळीने सिडकोच्या नावाने बनावट अलॉटमेंट लेटर आणि नोंदणीकृत कागदपत्रे तयार करुन सदर रक्कम उकळली. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अन्य नागरिकांचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

Loading content, please wait...