आजपासून सरकारी रुग्णालयातील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

आजपासून सरकारी रुग्णालयातील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

मुंबई 12 : आजपासून सरकारी रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होणार आहे. याबाबतचा आरोग्य विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जाहीर केला होता  

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण 34 रक्त पेढ्या कार्यरत आहेत आणि या रक्तपेढ्यांमार्फत प्रतिवर्षी सुमारे 1.5 लक्ष रक्त पिशव्या संकलित करुन गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात येतो. या संदर्भात शासनाने 27 एप्रिल 2015 च्या परिपत्रकानुसार रक्त पिशव्यांसाठी सेवा शुल्क दर निश्चित करण्यात आलेले आहेत.

सध्या देशात उद्भवलेल्या कोविड 19 महामारीमुळे सर्व सामान्य जनतेची सोय तसेच सर्वसामान्य रुग्णांची गरज व सोय लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलंग्न शासकीय रुग्णालयांमध्ये भरती असणाऱ्या रुग्णांना रक्तपेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार निर्णय घेत मोफत रक्त मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

काय आहे शासन निर्णय :-

वर्ष 2020-21 साठी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालय सलग्न शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांवर रक्तपेढीतील रक्त पिशव्या व रक्त घटक मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

free blood will be given in government hospitals to the patients admitted in government hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com