झोपडपट्टी परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी ठाणे पालिकेने घेतला हा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

धोकादायक इमारतींना दुरुस्ती परवानगी देताना काळजी घेणार

ठाणे : झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये कोरानाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे वितरित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींना दुरुस्तीची परवानगी देताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची पूर्ण दखातरजमा करावी, त्यानंतरच परवानगी द्याव्यात अशा सूचनाही सिंघल यांनी आज सर्व प्रभागस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

तुमचा पगार 30 हजारपेक्षा कमी आहे, मग 'ही' आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी

कोरोनाविरूद्धचा लढा किती दिवस चालणार, हे आज कोणीही सांगू शकत नाही आणि इतर आपत्तीपेक्षा ही आपत्ती वेगळी असल्याने कोणतीही परवानगी देताना ती काळजीपूर्वक देण्यात यावी असे सांगून सिंघल यांनी प्रतिबंधित क्षेत्रात शक्य तेवढी कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

 आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार...

अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून आयुक्तांनी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी कॅान्टॅक्ट ट्रेसिंग करताना अतिशय काळजीपूर्वक करावे, प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णांचे अतिजोखीम गटातील व्यक्ती तसेच कमी जोखीम गटातील व्यक्तींची तात्काळ वर्गवारी करावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पांढऱ्या कफन ऐवजी त्यांच्या नशिबी प्लॅस्टिकच... 'ते' भोगतायत मरणानंतरच्या मरणयातना; सायन रुग्णालय मधील विदारक वास्तव समोर....

दरम्यान, आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार ठाण्यातील  वागळे प्रभाग समितीमधील सी. पी. तलाव, किसननगर, पाईपलाईन, लोकमान्यनगर आणि मुंब्रा या ठिकाणी सुरुवातीस ही औषधे वितरित करण्यात येणार आहेत.

Free homeopathic medicines in densely populated areas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free homeopathic medicines in densely populated areas