तुमचा पगार 30 हजारपेक्षा कमी आहे, मग 'ही' आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर अनेक व्यवहार ठप्प झाले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांपासून सर्वांच्या मदतीसाठी सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर अनेक व्यवहार ठप्प झाले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांपासून सर्वांच्या मदतीसाठी सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहे. म्हणून केंद्र सरकारनं ईएसआयसी योजनेचा विस्तार करण्याचा विचार सुरु केला आहे. कमी पगार असणाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि कॅश बेनिफिट देण्याच्या उद्देशानं सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची सीमा वाढवू शकते. यासंदर्भात कामगार मंत्रालयानं कव्हरेजसाठी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगाराची मर्यादा वाढवण्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भातली माहिती इंग्रजी वृत्तवाहिनीच्या सुत्रांनी दिली आहे. 

कोणाला होणार फायदा 

कर्मचाऱ्यांच्या कव्हरेजसाठी पगाराची सीमा वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसा कामगार मंत्रालयानं अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात पगाराची सीमा 21 हजार रुपयांवरून 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, असं नमूद केलं आहे. 

लालपरी निघाली ! आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार...

ESIC योजना नेमकी काय आहे? 

ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते. तसंच ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा पगार (ग्रॉस सॅलरी) 30 हजार रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा फायदा मिळेल. त्यामुळे या योजनेचा विस्तार केल्यानं कंपन्यांवरील ओझे हलके होईल. एवढंच नाही, तर लॉकडाऊनमध्ये आवश्यक मेडिकल कव्हरचे ओझेही कमी होईल. सध्याची परिस्थिती पाहता जवळपास 12.50 लाख कंपन्यांना याचा फायदा होत आहे. 

ज्यांचे मासिक वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे कमीत कमी 10 कर्मचारी असलेल्या कंपनीमध्ये काम करतात, अशा सर्व कर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेचा लाभ मिळतो. यापूर्वी 2016 पर्यंत मासिक वेतनाची मर्यादा 15 हजार रुपये एवढी होती. ती 1 जानेवारी, 2017 पासून 21 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.

ऐन कोरोनाच्या काळात राज्यावर येणार 'हे' संकट..

सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला. याकाळात अनेक लोकं वर्क फ्रॉम करत आहेत. तर काहींचा पगार कपात केल्यानं नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे ज्यांचा पगार कमी आहे किंवा 30 हजारपर्यंत आहे. त्यांच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे.

good news for the people who have salaries lesser than 30 thousand rupees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for the people who have salaries lesser than 30 thousand rupees