डोंबिवली : फुकट पाणीपुरी दिली नाही म्हणून चाकूने हल्ला; गुन्हा दाखल

knife attack
knife attacksakal media

डोंबिवली : पाणीपुरीवाल्याने फुकट पाणीपुरी (Free Panipuri demand) न दिल्याचा राग येऊन एका 33 वर्षीय व्यक्तीने पाणीपुरीवाल्यासह दोघांना शिवीगाळ, मारहाण करीत एकावर चाकूने वार (Knife attack) केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात (kolsewadi police station) सुशिल पावशे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

knife attack
व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबाला चढला भाव; प्रेमवीरांच्या खिशाला कात्री

कल्याण पूर्वेतील गणेशघाट तलावाच्या बाजूला रविवारी सायंकाळी पाणीपुरी विक्रेत्याकडे सुशिल आला आणि त्याने त्याच्याकडे फुकट पाणीपुरी मागितली. त्यास पाणीपुरीवाल्याने विरोध केला असता सुशिलने पाणीपुरीच्या हातगाडीवरील सामान फेकून देत पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण केली. बाजूलाच पंक्चर दुकानावर काम करणारे अशोक शिरसाठ व चहावाला सुनिल यादव यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करीत अशोक यांच्यावर सुशिलने चाकूने हल्ला करीत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com