स्वातंत्र्यसैनिक प्रा. सत्यसंध बर्वे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

प्रा. सत्यसंध बर्वे हे उल्हासनगर येथील आर के टी महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. ते इतिहास आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. प्रा. बर्वे सरांनी श्रीमद भागवत चे साध्या सोप्या भाषेत समश्लोकी भागवत ग्रन्थ प्रकाशित केला होता.

अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ. सिद्धिविनायक बर्वे हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. 

प्रा. सत्यसंध बर्वे हे उल्हासनगर येथील आर के टी महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. ते इतिहास आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. प्रा. बर्वे सरांनी श्रीमद भागवत चे साध्या सोप्या भाषेत समश्लोकी भागवत ग्रन्थ प्रकाशित केला होता. महाराष्ट्र शासनाच्या गृहरक्षक दलाचे अनेक वर्षे अधिकारी होते. 

1942 च्या चले जाव चळवळीत प्रा. बर्वे यांनी सहभाग घेतला होता.1937 ते 1995 पर्यंत ते काँग्रेस पक्षात पदाधिकारी होते. नाशिक व येवले काँग्रेस उपाध्यक्ष होते. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सरचिटणीस पदावर होते. प्रदेश प्रतिनिधी पदावरही त्यांनी काम केले.  त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय  पुरस्कार मिळाला होता. टिळक स्मारक ट्रस्ट व शारदा ज्ञानपीठम तसेच पुणे महानगरपालिकेने प्रा. बर्वे याना पुरस्कार देऊन गौरवले होते. अंबरनाथ येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळातर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: freedom fighter Satyasandh Barve is no more