esakal | मुंबईत BMC च्या पथकाने फळविक्रेत्याची गाडी केली पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची फळ विक्रेत्यावर कारवाई

मुंबईत BMC च्या पथकाने फळविक्रेत्याची गाडी केली पलटी

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत सध्या लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू आहेत. जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं बंद आहेत. लोकांनी गर्दी करु नये, यासाठी कलम १४४ लागू आहे. राज्यात निर्बंध असले, तरी सरकारने भाजी, फळ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. निर्बंधांची अमलबजावणी करताना सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने काम करतायत त्याचे एक उदहारण समोर आले आहे.

मुंबईत महापालिकेच्या पथकाने एका फळ विक्रेत्याची गाडी पलटी केली. ज्यामुळे त्याचा हजारो रुपयांचा माल रस्त्यावर पडला. गाडी पलटी केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी नंतर या फळविक्रेत्याची गाडी सोबत घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुरकान शेख असे या फळ विक्रेत्याचे नाव आहे.

हेही वाचा: माथेरानमध्ये ४०० घोड्यांवर उपासमारीचे संकट

"काही महापालिका अधिकाऱ्यांनी माझी गाडी पलटी केली. त्यामुळे ३ हजार रुपये मालाचे नुकसान झाले. सोबत जाताना गाडीही घेऊन गेले. गाडी परत मिळवण्यासाठी महापालिका कार्यालयात २,२०० रुपये दंडही भरला. मागच्या १५ वर्षापासून मी मुंबईत फळविक्रीचा व्यवसाय करतोय. काही वेळा त्रासही झाला. बहुतेकवेळा पोलीसवाले कामाच्यावेळी कोविड नियमांचे पालन करण्यास सांगतात" असे फुरकान शेखने सांगितले.