मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला

मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावून फिरणाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे. रोज 20 हजार जणांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र तरी रोज 3-4 हजार जणांवरच कारवाई होत आहे. पूर्वीपेक्षा कारवाईत तिप्पट ते चौपट वाढ झाली असली तरी अनेक वेळा बाचाबाचीही होत आहे.

एप्रिल महिन्यापासून राज्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता मुंबईसह राज्यात अनलॉक होताना सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे तसेच मास्क वापरणे अधिक आवश्यक आहे. मात्र,नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत रोज किमान 1 हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मास्क न वापरणाऱ्यांकडून पूर्वी 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता. आता हा दंड 200 रुपये करण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर विभाग कार्यालयांनी कारवाई सुरु केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना हटकले असता हुज्जत घालणे तसेच अंगावर चालून येण्याचे प्रकार घडत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हे कर्मचारी मोहिमेवर

विभाग कार्यालयांनीही परिरक्षण, इमारत आणि कारखाने, दुकाने आणि आस्थापना, अनुज्ञापन, अतिक्रमण निर्मुलन, कीटक नियंत्रण, उद्यान खाते अशा विविध विभागांतील अभियंते आणि कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे. या विभागातील प्रत्येक कर्मचार्याला  रोज  5-10  व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

32 हजार लोकांवर कारवाई

11 ऑक्टोबर पासून पालिकेने विशेष सुरु केली असून 16 ऑक्टोबरपर्यंत 32 हजार जणांवर कारवाई झाली आहे. यातून 52 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिलपासून 10 ऑक्टोबरपर्यंत 26 हजार जणांवर कारवाई झाली होती. याकाळात रोज सरासरी 900 ते 1 हजार जणांवर कारवाई होत आहे. 

ऑक्टोबरमधील दिवस कारवाई
   
11 2740
12 4450
13 4933
14 6338
15 6860
16 7120

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

The frustration of employees took action against those who did not wear masks increased

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com