मुंबईतल्या मैदानांची देखभालीसाठी कंत्राटदारांचा पालिकेला शून्य प्रतिसाद

समीर सुर्वे
Monday, 19 October 2020

शहरातील उद्याने मैदानांची देखभाल करण्यासाठी मुंबई महानगर पालिका कंत्राटदार नियुक्त करत आहे. यापूर्वी पश्चिम उपनगरातील काही प्रभागांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहे.

मुंबईः शहरातील उद्याने मैदानांची देखभाल करण्यासाठी मुंबई महानगर पालिका कंत्राटदार नियुक्त करत आहे. यापूर्वी पश्चिम उपनगरातील काही प्रभागांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहे.

वांद्रेपासून दहिसरपर्यंतच्या पश्चिम उपनगरातील सहा प्रभागांत एक वर्षांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी 31 कोटी 78 लाखांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. 5 नोव्हेंबरपर्यंत या निविदा भरायच्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात पालिकेने अंधेरी पश्चिम, पूर्व, मालाड, गोरेगाव या विभागांसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र,कंत्राटदार न मिळू शकल्याने पालिकेने नव्याने निविदा मागवल्या आहेत.

अधिक वाचाः  गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला

महापालिका यापूर्वी दोन ते अडीज वर्षांसाठी कंत्राटदार नियुक्त करायची. यापूर्वी कंत्राटदारांनी पालिकेने ठरवलेल्या अंदाजित किंमतीपेक्षा 40 ते 45 टक्के किंमतीत कामे करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया नेहमीच वादग्रस्त ठरते.

प्रभागानुसार खर्च 

  • दहिसर - 2 कोटी 6 लाख 
  • बोरीवली - 5 कोटी 92 लाख 
  • कांदिवली - 3 कोटी 11 लाख 
  • गोरेगाव - 2 कोटी 44 लाख 
  • मालाड - 5 कोटी 17 लाख 
  • अंधेरी पूर्व - 8 कोटी 81 लाख 
  • वांद्रे पूर्व पश्चिम, अंधेरी पूर्व -4 कोटी 24 लाख 

धोरण नाही, 26 भुखंडावर संस्थानिक 

महापालिकेने विविध संस्थांना उद्याने मैदाने देखभालीसाठी दिली होती. मात्र,त्या ठिकाणी संस्थाने उभी राहिल्याने पालिकेनं मैदाने उद्याने ताब्यात घेण्यास सुरवात केली. मात्र,अद्याप 26 मैदाने आणि उद्याने पालिकेने ताब्यात घेतलेली नाहीत. या संस्था सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींशी संबंधित आहेत. त्यानंतर, पालिकेने 2016 मध्ये उद्याने मैदाने काळजीवाहू तत्वावर देखभालीसाठी देण्यासाठी धोरण तयार केले होते. मात्र, या धोरणाला नागरी संस्थांनी विरोध केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे धोरण रद्द करुन सुधारीत धोरण तयार करण्यास सांगितले मात्र, अद्याप हे धोरण तयार झालेले नाही.

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Zero response of contractors BMC for maintenance of grounds in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zero response of contractors BMC for maintenance of grounds in Mumbai