esakal | कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे केलयं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल 
sakal

बोलून बातमी शोधा

y

राज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा या कारागृहांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही.

कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे केलयं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कारागृहात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आता स्वतः कारागृहांमध्ये वास्तव्य करत आहेत. यावेळी सर्व स्थितीची बारकाईने माहिती घेतली जाते. अतिरिक्त महासंचालक(कारागृह) सुनील रामानंद यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात शनिवारी वास्तव्य केले.

राज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा या कारागृहांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही. 
सुनील रामानंद यांच्यासोबत उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग)योगेश देसाई हे देखील उपस्थित होते. यावेळी कारागृहातील सर्व कामकाजाची माहिती घेण्यात आली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या. पुण्यातील येरवडा कारागृहाची क्षमता 2449 आहे. पण सध्या येरवड्यामध्ये सुमारे सहा हजार कैदी आहेत. 

हेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' संपवणार 


राज्यातील कारागृहांतील क्षमतेच्या तुलनेत त्यात कैद्यांची संख्या दुप्पट आहे. म्हणूनच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालयाने 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या 11 हजार कैद्यांना 45 दिवसांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्या अंतर्गत राज्यातील विविध कारागृहामधील वैद्यकीय चाचणी करून पाच टप्प्प्यांमध्ये कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना कारागृहांमध्ये न पसरण्यासाठी प्रबोधन केले जात आहे तसेच एक चित्रफीत सुद्धा दाखवण्यात येत आहे. यामुळे कैद्यांमध्ये मोठी जागरुता निर्माण होण्याची दृष्टीने ही पावले उचलण्यात येत आहेत 

हेही वाचा...कोरोनापासून आईही मुलाचे संरक्षण करू शकते 

वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सुटका 
तुलनेने कमी गर्दी असलेल्या तळोजा कारागृहांमध्ये मुंबईतील अनेक कैद्यांना हलवण्यात आले आहे. अनेक कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात येत आहे. तर काही कारागृहात टेम्परेचर गनच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस सुरुवात केलीआहे. तर काही कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय अहवाल बाकी असुन, त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांना देखील दोन टप्यात सोडण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सागंतिले. तसेच राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया देखील कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे. 

4060 कैद्यांची आतापर्यंत सुटका 
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विविध कारागृहांमधून आतापर्यंत 4060 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यात आर्थररोड कारागृहातून सर्वाधीक कैद्यांचा समावेश आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून आतापर्यंत 336 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. 

loading image