
मनोर येथील वृद्धाश्रमातील एका वयोवृद्ध महिलेचा रुग्णालयात शनिवारी (ता. ४) मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्याने मनोरमधील मुस्लिमांनी पुढाकार घेऊन मुलाच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या या नागरिकांचे कौतुक होत आहे.
मुंबई : मनोर येथील वृद्धाश्रमातील एका वयोवृद्ध महिलेचा रुग्णालयात शनिवारी (ता. ४) मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्य नसल्याने मनोरमधील मुस्लिमांनी पुढाकार घेऊन मुलाच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या या नागरिकांचे कौतुक होत आहे.
महामार्गावरील वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे ( ८९) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा शनिवारी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिचा मुलगा प्रकाश बिनसाळे हा मुंबईहून मनोरला पोहोचला, परंतु लॉकडाऊनमुळे मृतदेह मुंबईला नेणे शक्य नसल्याने मनोरलाच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता.
या वेळी मनोरचे सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालक बिलाल रईस, बिलाल खतीब, फुरकान खतीब, रयान दळवी, फरहान दळवी आणि युसूफ मेमन आदींच्या मदतीने हात नदीवरील स्मशानभूमीत तिच्यावर हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. देश कठीण परिस्थितीतून जात असताना मनोरच्या मुस्लिमांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्त्वाची बातमी..
आता जहाजावर केले जाणार क्वारंटाईन..