वरळी स्मशानभूमीत वेब कास्टिंगद्वारे पाहता येणार अंत्यसंस्कार, सरणाजवळ CCTV बसवणार

वरळी स्मशानभूमीत वेब कास्टिंगद्वारे पाहता येणार अंत्यसंस्कार, सरणाजवळ CCTV बसवणार

मुंबईः अंत्यसंस्कारच्या वेळेस कुटुंबातील ज्या सदस्य आणि नातेवाईकांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. अशा देश- विदेशातील व्यक्तींसाठी घरूनच अंत्यसंस्कार पाहण्याची सुविधा वरळीच्या माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीत वेब कास्टिंगद्वारे लवकरच उपलब्ध होणार आहे.

वरळी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी हिरालाल पारेख परिवार चॅरिटी ट्रस्टने पुढाकार घेतला असून अंत्यसंस्कारसाठी विना अडचण सुलभता निर्माण व्हावी यासाठी लवकरच या स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येणार आहे. यात वेब कास्टिंगसह अन्य सुविधा स्थानिकांना विनामूल्य मिळणार आहे.

देश विदेशातील मृतांच्या नातेवाईकांना उपयुक्त ठरेल अशा अत्याधुनिक सुविधांसाह सुशोभीकरण करण्यात येत असलेले वरळीचे स्मशानभूमी भारतातील सर्वात मोठे आधुनिक दर्जाचे स्मशानभूमी म्हणून ओळखले जाणार असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त डॉ. भरत पारेख यांनी सांगितले.

स्मशानभूमीतील ८० हजार चौ. फू क्षेत्रफळ जागेत आठ सरण उभारण्यात येणार आहे. प्रत्येक सरणाजवळ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.  तर तीन गॅस, दोन मुक्तिधाम, लाकूड ठेवण्यासाठी जागा, प्रार्थना सभेसाठी वातानुकूलित कक्ष, तसेच वेब कास्टिंगची सुविधा उभारण्यासाठी आणि देखभालीसाठी कार्यालय उभारण्यात येणार आहे.

पालिकेच्या सहयोगाने ट्रस्टच्या वतीने वरळी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या टप्यात चार शय्याचे काम सपटेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रकलप व्यवस्थापक अंकित म्हात्रे यांनी दिली.  

वरळी स्मशानभूमी सुशोभीकरण प्रकल्पाचा खर्च ४० कोटी इतका असून त्यातील निम्मा निधी टाटा ग्रुप, महिंद्रा ग्रुप, एचडीएफसी यांच्या कडून घेण्यात आला असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

कुटुंबातील अनेकजण आपल्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारात जाऊ शकत नाहीत तर काहींना परदेशातून येणे शक्य होत नाही. अशावेळेस त्यांना वेब कास्टिंगद्वारे शेवटचे संस्कार पाहणे उपयुक्त ठरू शकेल.

डॉ. भरत पारेख, विश्वस्त, हिरालाल पारेख परिवार चेरीटी ट्रस्ट
--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Funerals can be seen through web casting Worli Cemetery

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com