
Mumbai : जी 20 परिषदेची मुंबईत बैठक; हे रस्ते बंद
मुंबई : मुंबईतील ताज हॉटेलमध्ये 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या जी 20 परिषदेच्या सुरक्षेबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी आदेश जारी केले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते 12 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या मार्गांवरून वाहतूक टाळावी असे मुंबई वाहतूक पोलिसांकडून जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं दुसरा मार्ग वापरावा असे आव्हान केले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिसांनी कोणते मार्ग बंद राहतील याची सूचना जारी केली आहे. वाहनधारक कोणत्या पर्यायी मार्गाने जाऊ शकतात याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित रस्त्यावर कोणत्याही वाहनाच्या हालचालीवर बंदी असेल, परंतु रुग्णवाहिका सारख्या आपत्कालीन सेवा असलेली वाहनांचा या यादीत समावेश नाही. अनेक रस्ते बंद झाल्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी रस्ता जाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गानेच प्रवास करावा.
हे रस्ते बंद
-छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
- पी रामचंदानी मार्ग
- बी के बोमन बेहराम मार्ग
- अॅडम स्ट्रीट वे
- महाकवी भूषण मार्ग
13 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 11.30 वाजेपर्यंत सर्व रस्ते बंद राहतील.