जामीन मिळण्यासाठी आनंद तेलतुंबडेंचा विशेष NIA न्यायालयात अर्ज| Anand Teltumbde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Teltumbde

जामीन मिळण्यासाठी आनंद तेलतुंबडेंचा विशेष NIA न्यायालयात अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नक्षलवादी चकमकीत (Naxalite) मारला गेलेल्या मिलिंद तेलतुंबडेच्या (Milind teltumbde) भावाने, प्रा आनंद तेलतुंबडे (Anand teltumbde) यांनी जामीन (bail) मिळण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात (special NIA court) अर्ज केला आहे. गडचिरोलीतील (Gadchiroli encounter) कोर्चीमध्ये झालेल्या चकमकीत 26 जण (naxalite killed) ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचा समावेश आहे. सन 2018 च्या एल्गार परिषद प्रकरणात (Elgar parishad) मिलिंद फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आला आहे. एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडेदेखील आरोपी आहेत.

हेही वाचा: मुंबई : विमा कंपनीचे एजंट बनून 19 लाखांंची लूट; पाच आरोपींना अटक

नव्वदीच्या दशकात मिलिंदचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध तुटला आणि तो कोणाच्या संपर्कात नव्हता. माझ्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आईचे वय नव्वदच्या आसपास आहे. घरातील मोठा मुलगा या नात्याने अशा प्रसंगी मी त्यांच्या बरोबर असणे भावनिक द्रुष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे मला पंधरा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी तेलतुंबडे यांनी अर्जात केली आहे.

विशेष न्या डि ई कोथळीकर यांनी यावर एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने तेलतुंबडे यांना फोनवरून आईशी बोलण्याची परवानगी दिली होती. तेलतुंबडे यांच्यावरही एनआयएने गंभीर आरोप केले असून आरोपपत्र दाखल केले आहे.

loading image
go to top