Ulhasnagar News : मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल

मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून १६ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अंबरनाथ येथे घडली.
mobile gaming
mobile gamingsakal
Updated on

उल्हासनगर - मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून १६ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी अंबरनाथ येथे घडली आहे. अमन साहू (वय-१६) असे या मुलाचे नाव असून, तो दहावीत शिकत होता.

अखेर त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

अंबरनाथ शहराच्या नेवाळी गावात अमन साहू राहत होता. तो रोज मोबाईलवर ‘बॅटल ग्राउंड’ हा ऑनलाइन गेम खेळायचा. या गेमच्या नादात त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून पालकांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता; मात्र याचा राग अनावर झाल्यामुळे अमनने गुरुवारी सकाळी घरात कोणी नसताना आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर हिललाइन पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com