
मुंबई : पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने मोठं पाऊल उचलले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ई बग्गी सुरू करण्यात येणार आहे. पर्यटकांना उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.