गणेश नाईक यांना दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA Ganesh Naik
गणेश नाईक यांना दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे

गणेश नाईकांना दिलासा नाहीच; अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीस ठाणे सत्र न्यायालयानं आज नकार दिला. या प्रकरणी २७ एप्रिलला सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. त्यामुळं गणेश नाईक यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. (Ganesh Naik is not gets relief, anticipatory bail hearing postponed)

हेही वाचा: कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार

गणेश नाईक यांच्याबाबात दोन प्रकरण ठाणे कोर्टात आहेत. यांपैकी एक प्रकरण रिव्हॉल्वरची भीती दाखवून धमकावल्याचं आहे. तर दुसरं प्रकरण हे बलात्काराचं आहे. ही दोन्ही प्रकरणं एकाच कोर्टात हस्तांतरीत करण्यात यावीत अशी मागणी नाईक यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आली होती.

हेही वाचा: महापालिका निवडणुका आणखी लांबणार? सुप्रीम कोर्टानं सुनावणी ढकलली पुढे

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत २७ तारखेपर्यंत पोलिसांना या प्रकरणांत काय वाटतं आणि तपास अधिकाऱ्यांना काय वाटतं? हे जाणून घेतल्यानंतर यावर सुनावणी घेण्यात येईल, असं कोर्टानं म्हटलं आहे. तसेच अटकपूर्व जामिनावरही सुनावणीस कोर्टानं नकार दिला. जोपर्यंत पोलीस त्यांचा जबाब नोंदवत नाहीत तोपर्यंत गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन देण्यात येणार नाही, अशी भूमिक कोर्टानं घेतली. आता या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २७ एप्रिललाच होणार आहे. तोपर्यंत नाईक यांना कोणताही दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिला आहे.

Web Title: Ganesh Naik Is Not Gets Relief Anticipatory Bail Hearing Postponed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News
go to top