

Ganesh Naik Holds First Janata Darbar in Vasai-Virar
Sakal
विरार : गणेश नाईक यांनी ठाण्यात आणि मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्या नंतर आता त्यांनी उद्या (१४ नोव्हेम्बर) वसई विरार क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करून शिंदेंना इशारा तर ठाकुरांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा वसई विरार मध्ये सुरु आहे. पालघर जिल्हा कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबार पार पडत असले तरी वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी एकही जनता दरबार झाला नव्हता. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांचा शुक्रवारी महापालिकेत जनता दरबार पार पडणार आहे.