
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ठ करण्यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतुरा सुरु आहे. त्यातच ही गावे स्थानिक स्वराज्य निवडणुकी पुरतीच नवी मुंबईत राहतील. निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच सहा महिन्यात ही गावे बाहेर काढली जातील, असा गोप्यस्फोट वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा 14 गावांचा नवी मुंबईतील समावेशाचा मुद्दा एरणीवर आला आहे. या गावांचे भवितव्य नक्की काय अशी चर्चा रंगली आहे.