गणेश नाईकांचे 'ते' चार खासंखास नगरसेवक आज बांधणार शिवबंधन?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरला जाणारा हे निश्चित होतं.

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरला जाणारा हे निश्चित होतं. आता नवी मुंबई महानगरपालिकेसाठी देखील याच फॉर्म्युल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना वाटचाल करताना दिसतेय. महाविकास आघाडीने या निवडणुकीवर पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित केलंय.

हेही वाचा - टायमिंग साधत राष्ट्रवादीचा भाजपला टोला!

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानली जाणारी नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईकांच्या भाजपमध्ये जाण्याने भाजपकडे गेलीये. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने अनेक नागरपालिकांवरील आपली सत्ता गमावली आहे . अशात भाजपसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे स्वतः अजित पवार यांनी नवी मुंबई महानगरपालिका जिंकून दाखवण्याचा उचललेला विडा. नुकताच अजित पवार यांनी वाशीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी 'आता महापौर निवडला जाईल, सभापती निवडला जाईल, स्थायी समिती अध्यक्ष निवडला जाईल, मात्र यापैकी नाईक घरातील कुणीच नसेल असं बोलून दाखवलंय. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या कायम वरचष्मा राहिलाय, अशात महाविकास आघाडीसाठी देखील येऊ घातलेली निवडणूक सोपी नसणारे. 

महत्त्वाची बातमी - रविंद्र वायकरांची CMO च्या मुख्य समन्वयकपदी होणार नेमणूक?

दरम्यान गणेश नाईक यांच्या काम करण्याच्या पद्धतीने अनेक भाजप नगरसेवक नाराज आहेत अशी देखील चर्चा आहे. हे तेच नगरसेवक आहेत जे गणेश नाईकांसोबत भाजपात गेले होते. एकूण 14 नगरसेवक गणेश नाईक यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय. अशात गणेश नाईक यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे चार नगरसेवक महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याचं समजतंय. या चारही नगरसेवकांनी महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश केला तर  भाजपसाठी सत्ता राखणं कठीण होईल.  

सुरेश कुलकर्णी यांनी गणेश नाईक यांचे खंदे समर्थक, अशात आता सुरेश कुलकर्णी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं समजतंय. सुरेश कुलकर्णी चार नगरसेवकांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतंय. महत्त्वाची बाब म्हणजे आज सुरेश कुलकर्णी नवी मुंबईतील तुर्भेमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. या कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार  राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत.  तुर्भे भागातून 8 ते 9 नगरसेवक निवडून येतात. अशात सुरेश कुलकर्णी यांच्यासोबत गणेश नाईकांच्या जवळच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत केला तर येणारी निवडणूक होम पिचवर खेळणाऱ्या गणेश नाईक यांना कठीण होईल हे सांगायला कुणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही.
 

web title : Ganesh Naik's four close corporates will band Shivbandhan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Naik's four close corporates will band Shivbandhan