रवींद्र वायकरांची CMO च्या मुख्य समन्वयकपदी होणार नेमणूक?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख आहे. अशात रवींद्र वायकर यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी देणार असल्याची सूत्रांची माहितीये. CMO म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य समन्वयकपदी रवींद्र वायकर यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मंत्री, आमदार यांचाट समन्वय ठेवण्यासाठी CMO च्या मुख्य समन्वयकपदी रवींद्र वायकर यांची वर्णी लागणार आहे. 

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले नेते म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख आहे. अशात रवींद्र वायकर यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी देणार असल्याची सूत्रांची माहितीये. CMO म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या मुख्य समन्वयकपदी रवींद्र वायकर यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मंत्री, आमदार यांचाट समन्वय ठेवण्यासाठी CMO च्या मुख्य समन्वयकपदी रवींद्र वायकर यांची वर्णी लागणार आहे. 

मोठी बातमी - टायमिंग साधत राष्ट्रवादीचा भाजपाला खोचक टोला, म्हणाले..

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तीनही पक्षात मंत्रिपदासाठी चुरस होती. अशात अनेकांना मंत्रिपद मिळालेलं नाही. रवींद्र वायकर हे भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. अशात यंदा वायकर यांना कॅबीबीनेट मंत्रिपद जाईल असं बोललं जात होतं. दरम्यान आता रवींद्र वायकर यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. या संबंधीची अधिकृत माहिती येत्या काही दिवसात दिली जाईल असं सूत्रांकडून समोर येतंय. 

मोठी बातमी -  कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन ? हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर ?

रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील मानले जातात. अशात वायकर यांचं पुनर्वसन कसं होणार याकडेदेखील अनेकांचं लक्ष होतं. आता मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून रवींद्र वायकर यांची निवड निश्चित झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. हे पद महाराष्ट्रातील कॅबिनेट दर्जाचं पद असू शकतं असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. यामध्ये मंत्री, आमदार याचसोबत महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क ठेवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे ही कामं रवींद्र वायकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी समन्वय ठेऊन पार पडताना पाहायला मिळतील. 

मोठी बातमी -  बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो; सात महिलांना अटक!

कोण आहेत रवींद्र वायकर 

रवींद्र दत्ताराम वायकर हे शिवसेनेचे नेते आहेत. १४ व्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन टर्म रवींद्र वायकर हे आमदार राहिलेत. या पूर्वीच्या सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे तंत्र आणि उच्चशिक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली गेलेली. 

ravindar waikar will be designated on the chief coordinator post of CM office of maharashtra 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravindar waikar will be designated on the chief coordinator post of CM office of maharashtra