
Mumbai News : कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांना फटका !
मुंबई : गौरी-गणपतीचे विसर्जन करुन कोकणातून चाकरमान्यानी मुंबईकडे परतू लागले आहे. मात्र, पहाटे मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना पनेवल स्थानकात घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकचा फटका बसत आहे. पनवेल स्थानकात पहाटेच्या वेळी उतरलेल्या प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने चाकरमान्यांना परिणामी टॅक्सी, रिक्षातून प्रवास कारवाया लागत आहे. त्यामुळे कोकणातून पार्ट येणाऱ्या चाकरमान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी पनवेल स्थानकात २ ऑक्टोबरपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे.या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून पनवेलकरिता शेवटची लोकल रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी सुटत आहे. तसेच अनेक पनवेल लोकल बेलापुरपर्यत धावत असून तेथूनच सीएसएमटीकरिता रवाना होत आहे.पनवेलहून सीएसएमटीला जाण्यासाठी पहाटे ४.०३ आणि पहाटे ५.३१ची लोकल रद्द केली आहे.
तर पनवेल स्थानकातून सीएसएमटीकरिता पहिली लोकल पहाटे ५.४०वाजता चालविण्यात येत आहे. याशिवाय अनेक लोकल पनवेल ते बेलापुर दरम्यान रद्द केल्या आहेत. त्यामुळे पहाटे पनवेल स्थानकात उतरलेल्या चाकरमान्यांना लोकल उपलब्ध होत नाही. परिणामी घरी पोहोचण्यासाठी चाकरमान्यांना ओला-उबर आणि खासगी टॅक्सी मदत घ्यावीत लागत आहे. विशेष म्हणजे अनेकजण संधीचा फायदा उचलत अव्वाच्या सव्वा भाडे आकारात असल्याचा प्रवाशांना तक्रारी आहे.