esakal | नियमानुसारच गणेशोत्सवाला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नियमानुसारच गणेशोत्सवाला परवानगी : महापौर किशोरी पेडणेकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी (Public Ganeshotsav Mandals) राज्य सरकारने (State Government) ठरवलेल्या नियमानुसारच परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठी मंडळांना ताटकळत राहावे लागू नये यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात (office) सुविधा केंद्रासह कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश आज महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिले.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली आहे; मात्र काही प्रभागांत स्थानिक पातळीवर पालिका आणि पोलिस अधिकारी नियमावली तयार करत असून मंडळांची कोंडी करत आहेत, असा आरोप गणेशोत्सव समन्वय समितीने केला होता. महापौरांना पत्र दिले होते. त्यानंतर आज महापौरांनी समन्वय समिती राज्य सरकारने जे निकष ठरवले आहेत, त्याबाबत त्यांनी आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यानुसारच गणेशोत्सवाला परवानगी देण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

मंडळांनी केलेल्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रभाग कार्यालयाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप समन्वय समितीकडून करण्यात आला. त्यावर प्रत्येक प्रभागात मंडळाच्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी ठराविक वेळी कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

हेही वाचा: गणपतीच्या तयारी साठी लोकांची गर्दी; पाहा व्हिडिओ

आरतीच्या वेळी गर्दी नको

गणपतीच्या आरतीवेळी केवळ १० कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. ही मर्यादा वाढवण्याची मागणी मंडळांनी केली; मात्र पालिकेने मंडपात गर्दी नकोच अशी भूमिका घेतली. दुपार आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन करण्याचे महापौरांनी नमूद केले.

loading image
go to top